भुजबळांच्या मनात आजही बाळासाहेबांचीच शिवसेना

भुजबळांच्या मनात आजही बाळासाहेबांचीच शिवसेना

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी दिल्या शिवसैनिकांना शुभेच्छा... 

 

भुजबळांच्या मनात आजही बाळासाहेबांचीच शिवसेना

शुभम बोडके

शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनामित्त माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत, त्यानंतर खरी शिवसेना कोण हे वेळ आल्यावर जनताच ठरवेल असही ते म्हणाले. दोन्ही गटांमध्ये वर्धापन दिना निमित्त मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शने होत आहेत. त्यावर भजबळांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तसेच कायंदे शिंदे गटात गेल्या आता पर्यत मला असं वाटत होत कि त्या कट्टर ठाकरे यांच्या बाजूने आहेत. असही ते म्हणाले. 

   शिवसेनेच्या पहिल्या मिटिंग पासून मी जायला लागलो, शाखाप्रमुख जे पहिले झाले त्यातला मी एक आणि मला आठवत कि अश्या वर्धापन दिन निम्मित आम्ही माजगाव असेल भायखाळा,परेल, चेंबूर असेल आम्ही ट्रक मधून भरून घोषणा देत देत जायचो, आज काल बस ने जातात, ७३ साला मध्ये मी नगरसेवक झालो पण ७८ सालामध्ये मी शिवसेनेचा गट नेता झालो. आणि तेव्हा पासून शिवाजी पार्क च्या सभेमध्ये सुद्धा मला बाळासाहेबांनी बोलण्याची संधी द्यायला सुरुवात केली. अजूनही शिवसेना फुटली हि गोष्ट मनाला पटलेली नाही. असं माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले.

  शिवसेनेचा जुना नेता म्हणून शिवसेना दुभागली गेली याचं आजही वाईट वाटत, मी सुद्धा शिवसेना सोडली काही निर्णय पटतात, काही निर्णय पटतात नाहीत, त्यामुळे लोक जातात, आजही बाळासाहेबांची शिवसेनाच आमच्या मनात आहे. आजही आठवत कठीण परिस्थिती मध्ये बाळासाहेब उभे राहायचे आणि त्यांच्या बरोबर सगळे शिवसेनिक उभे राहायचे. आणि आजही शिवसेना अबैद्ध राहावी असं भुजबळ म्हणाले.