राज्य उत्पादन शुल्क विभागाची पंचवटीतील हातभट्टी अड्ड्यावर धाड

राज्य उत्पादन शुल्क विभागाची पंचवटीतील हातभट्टी अड्ड्यावर धाड

राज्य उत्पादन शुल्क विभागाची पंचवटीतील हातभट्टी अड्ड्यावर धाड

1,570 लिटर हातभट्टीवरील गावठी दारू जप्त

कारसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

तीन संशयीत ताब्यात तर तिघेजण फरार

प्रकाश धुर्वे 

नाशिक: पंचवटीतील वाल्मिकनगर आणि संभाजीनगर रोडवर (औरंगाबाद रोड) या दोन ठिकाणी हातभट्टी गावठी दारु अड्ड्यावर छापा टाकून चारचाकी कारसह सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी ही कारवाई करत तिघांना अटक केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पंचवटीतील वाल्मिक नगर, आणि छत्रपती संभाजीनगर रोडवरील (औरंगाबाद रोड) हातभट्टी दारु विक्रीच्या अड्ड्यांवर पथकाने कारवाई करीत १ हजार ५७० लिटर हातभट्टी गावठी दारु जप्त केली आहे.

या कारवाईत एक चारचाकी वाहन ३ मोबाइल, मद्य बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि गावठी दारु असा एकूण ४ लाख ४७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पथकाने गौरव रमेश पाटील, मनोज बापुराव पिंपळसे, हर्षल कैलास पाटील यांना अटक केली आहे. तर तिघे संशयित फरार झाले आहेत.

विभागातील अ विभागाचे निरीक्षक योगेश सावखेडकर, दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील, भावना भीरड, सहायक दुय्यम निरीक्षक मायकल पंडित, जवान विरेंद्र वाघ, राहुल जगताप, विजय पवार व मंगलसिंग जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.