मंत्री सावलीत जनता उन्हात...

मंत्री सावलीत जनता उन्हात...

मंत्र्यांच्या कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी 

मंत्री सावलीत जनता उन्हात...

ढसाळ नियोजननात लोकार्पण सोहळा...?

लहान मुलांसह जेष्ठ नागरिक ताटकळले भर उन्हात 

आमीन शेख

मनमाड: दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार तथा केंद्रीय आरोग्यराज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय माजीमंत्री जयकुमार रावल व गोव्यातील भाजपचे खासदार यांच्या हस्ते मनमाड ते चाळीसगाव या चोपदरी महामार्गाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला मात्र या सोहळ्याचे कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता अचानकपणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसला असुन कार्यक्रम सुरू करण्यसाठी ऐनवेळी या महार्गावर वाहतूक रोखून धरण्यात आली यामुळे लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांना भर उन्हात ताटकळत उभे रहावे लागले, यामुळे नागरिकांनी निषेध व्यक्त करत मंत्री सावलीत मतदार उन्हात अशी भावना व्यक्त केली. तर पोलिस प्रशासनाने नियोजन करून वाहतूक दुसऱ्या मार्गाने किंवा एकेरी केली असती तर जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला नसता अशी भावनाही व्यक्त करण्यात आली.यामुळे मंत्री येता शहरी वाहतूक कोंडी करी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.