उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यामुळे नाशिकरोडल मध्ये तणाव

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यामुळे नाशिकरोडल मध्ये तणाव

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यामुळे नाशिकरोडल मध्ये तणाव

 

संदीप नवसे

नाशिकरोड : नाशिक पुणे रोडवरील मॅग्नम हॉस्पिटलमध्ये लेप्रोस्कोपीला गेलेल्या एका 28 वर्षीय महिलेचे निधन झाले. भुलीचा ओव्हर डोस झाल्यामुळे निधन झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत रुग्णालयात गोंधळ घातला .नाशिकरोड पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.रात्री उशिरापर्यंत येथे मोठी गर्दी झाली होती. ऋतिका डोळस असे निधन झालेल्या महिलेचे नाव आहे. याविषयी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना गौरव डोळस यांनी सांगितले की माझ्या पत्नीला लॅप्रोस्कोपी करण्यासाठी येथे दाखल केले होते. दरम्यान भूलतज्ञ डॉक्टरांनी जास्त भुल दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला असून या प्रकरणातील जबाबदार डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह घेणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव देत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त नातेवाईकांनी रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला.