अल्पवयीन मुलींना रिसॉर्ट मध्ये  नाचवले जात असल्याचा प्रकार उघडकीस

अल्पवयीन मुलींना रिसॉर्ट मध्ये नाचवले जात असल्याचा प्रकार उघडकीस

पहिनेतील खासगी वसतिगृहातील घटनेने खळबळ

अल्पवयीन मुलींना रिसॉर्ट मध्ये नाचवले जात असल्याचा प्रकार उघडकीस

होळीच्या मुलींच्या पालकांनी केली वाडी वाडीवऱ्हे पोलिसात तक्रार 

प्रकरणी संस्था चालक आणि शिक्षिकांविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिसात गुन्हा दाखल 

सुमित बोधक 

  त्र्यंबकेश्वर / इगतपुरी : धक्कादायक बातमी आहे ती नाशिक जिल्ह्यातून ... त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने गावातील खासगी संस्थेच्या वसतिगृहातील अल्पवयीन मुलींना खाजगी रिसॉर्ट मध्ये घेऊन जात नाचवले जात आहे. पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचण्यास सांगितले जात असल्याची तक्रार पालकांनी केल्याने खळबळ उडालीये. विशेष म्हणजे ही शाळा आणि रिसॉर्ट एकाच मालकाचे असल्याची चर्चा या भागात आहे. या प्रकारामुळे पालकांनी मुलींना घरी आणले असून, या प्रकरणी संस्थेचे चालक आणि शिक्षिकांविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय‌

पहिने येथे एका खासगी संस्थेची काही वर्षांपासून कायमस्वरूपी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. या शाळेला जोडून यंदा मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले. शाळा सुरू होण्यास पंधरा दिवसांचा अवधी असताना वसतिगृहात सातवी ते नववीच्या विद्यार्थिनींना ३१ मे २०२३ पासूनच प्रवेश देण्यात आला. सुटीतमुलींना पारंपरिक नृत्य आणि संगणक शिक्षण दिले जाणार असल्याचे संस्थेने सांगितले होते. प्रत्यक्षात संगणक शिक्षण दिले नसल्याचा आरोप मुलींनी केला. संस्थेची सहावीपर्यंतच शाळा असल्याने या मुलींना त्र्यंबकेश्वर येथील शाळेत शिक्षणासाठी पाठविले जाते. पालकांनी मुलींसाठी प्रत्येकी ३,५०० रुपये अनामत रक्कम जमा केली. या संस्थेच्याशाळेमागील टेकडीवर हॉटेल असून, तेथे मे महिन्याच्या अखेरीस काजवे पाहण्यासाठी पर्यटक येतात. त्यांच्यासमोर सायंकाळी सहा ते रात्री नऊदरम्यान नाचण्यास सांगितले जाते. नाचले नाही तरी शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरून दमदाटी करतात छड्या मारतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली. पालकांच्या वतीने वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या मुलींना आता दुसऱ्या शाळेत दाखल केल्याचे पालकांनी सांगितले.