अल्पवयीन विद्यार्थिनीस पळवून नेत अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

अल्पवयीन विद्यार्थिनीस पळवून नेत अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

अल्पवयीन विद्यार्थिनीस पळवून नेत अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक 

 

श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई

 

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील १४ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करणाऱ्या बस चालकाच्या श्रीरामपूर शहर पोलीसांनी मुसक्या आवळल्या असून त्यास अटक करण्यात आली आहे.

             देवळाली प्रवरा येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असलेली नरसाळी ता.श्रीरामपूर या भागातील रहिवाशी असलेली १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचे शाळेचा बस चालक विजय गोविंद गोडसे, रा. देवळाली ता. राहुरी जि. अहमदनगर याने अपहरण केले होते. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशने येथे भादवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी आरोपीचा शोध घेणे कामी तपास पथकास आदेश दिले. तपास पथकाने तात्काळ आरोपीचाआणिअल्पवयीन मुलीचा शोध सुरू केला, मोबाईल ट्रॅकीग, सी.डी.आर. / एस.डी.आर. रिपोर्ट तसेच फेसबुक, व्हॉट्सअप,इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट च्या माध्यमातुन शोध चालु केला असता.पोलीस आपल्या मागावर असल्याचे आरोपीस सुगावा लागल्याने आरोपी याने अल्पवयीन तरुणीस १० जुन रोजी सांयकाळी ६ वाजता राहुरी फॅक्ट्ररी येथे सोडुन निघुन गेला होता. सदर अल्पवयीन तरुणीस विश्वासात घेवुन विचारपुस केली

असता तिच्या शाळेचा बस चालक विजय गोविंद गोडसे याने माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, तुझे आई वडील तुला नेहमी त्रास देतात, ते मला पाहवत नाही, आपण

त्याच्यापासुन लांब कुठेतरी निघुन जावु, असे बोलुन मला माझे राहते घरुन घेवुन गेला. मी अल्पवयीन असल्याचे माहित असताना सुध्दा त्याने माझ्यावर लैगिक अत्याचार केला. असा जबाब तरुणीने दिल्याने दाखल गुन्हयात भांदवि कलम 366, 366 (अ), 376 पोक्सो कलम 4, 5 (फ), 6, 11,12 प्रमाणे वाढ करुन आरोपीचा शोधाकरीता दोन पथके करुन शोध सुरु केला. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना या गुन्हयातील आरोपी हा राहुरी फॅक्ट्ररी परीसरात येणार असल्याची गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने

पोलीस निरीक्षक गवळी यांच्या आदेशा नुसार तपास पथकाने सापळा रचुन विजय गोविंद गोडसे यास शिताफीने 

ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.

                 श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, साहय्यक फौजदार सुधिर हापसे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस काँ. गौतम लगड, पोलीस कॉ. राहुल

नरवडे, पोलीस कॉ. रमिझराजा अत्तार, पोलीस कॉ. गणेश गावडे, पोलीस कॉ.मच्छिंद्र कातखडे, पोलीस कॉ. संभाजी खरात,पोलीस कॉ.भारत तमनर तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील पोलीस नायक सचिन धनाड, पोलीस कॉ. प्रमोद जाधव व पोलीस कॉ. आकाश भैरट यांनी केला आहे.पुढील तपास साहय्यक पोलीस निरीक्षक जिवन बोरसे हे करीत आहेत.