
वंचित बहुजन आघाडीचे प्रांत कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन, विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. ... सविस्तर प्रकरण आहे काय...?
वंचित बहुजन आघाडीचे प्रांत कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन,
विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. ... सविस्तर प्रकरण आहे काय...?
अक्षय भालेराव या वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्या गावातील जातीय तणाव दूर व्हावा आणि सामाजिक सलोखा राखून संविधानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी व्हावी म्हणून वंचित बहुजन आघाडीने सर्व प्रयत्न केले आणि भीम जयंती गावात साजरी झाली. मात्र त्या गोष्टीचा राग मनात धरून जातीयवादी लोकांनी अक्षयवर हल्ला केला आणि त्याचा निर्घृण खून केला.
तसेच हदगाव तालुक्यातील मौ. वाळकी खुर्द येथील आहे. या गावातील मातंग समाज हा गेल्या दोन वर्षांपासून आपले उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत अभिवादन करित असतात, मौ वाळकी या गावात बौद्ध समाज हा राहात नसतानाही, येथील मातंग समाज हा " भिमजयंती" का साजरी करतोय, हीच बाब येथील जातीयवादी मंडळीना खटकत होती, अस्वस्थ करित होती, या जातीवद्वेषातुनच भिमजयंती साजरी केल्याचा राग मनात धरून मातंग वस्तीवर रात्रीच्या वेळी लाईट बंद करून जमावाने सामुहिक जिवघेणा हल्ला केला, या हल्ल्यात मातंग समाजातील गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला होता, सुदैवाने या हल्यात कुणाची हत्या नाही झाली तरी भविष्यात वाळकी येथील ही जातीयवादी मंडळी मातंगातील कोणत्या तरी स्वाभिमानी आंबेडकरी विचाराच्या तरुणाचा बळी पेतील, अशी शक्यता आहे. मौ. वाळकी येथील ही जातीयवादी मंडळी सामुहिक हल्ला करून न थांबता, मौ. वाळकी येथील मातंग समाजातील 15-16 तरुणावर दरोड्याचा खोटा गुन्हा नोंदवित जेलमध्ये टाकले आहेत.
तिसरी घटना ही लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात अत्यंत क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. गिरीधर तबधाले या मातंग बांधवाने गावातील सावकाराकडून तीन हजार रुपये 10% टक्याने व्याजाने घेतले. तीन हजारांच्या बदल्यात 20 हजार रुपये वसूल केले तरीही आणखी पैसे बाकीच आहे म्हणत भर बाजारात त्यांना काठीने मारहाण केली. तबकाले रेणापूर पोलीस स्टेशनला गेले असता त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही, त्यामुळे आरोपीचे बळ वाढले व त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिधर तबघाले याच्या घरी हल्ला चढवला. यात आरोपींनी मिरची पावडर डोळ्यात टाकून रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात मातंग बांधव मृत्यूमुखी पडला, पोलिसांनी तेव्हाच तातडीने कारवाई केली असती तर मातंग बांधवाचा जीव गेला नसता..
चौथी पटना मुंबईत चर्च गेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृह येथे 19 वर्षीय बौद्ध युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. मंत्रालायाशेजारी हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी अशी घटना घडणे म्हणजे राज्याची कायदा व सुव्यवस्था कोलमडल्याचे लक्षणआहे.
या सर्व घटना वरून महाराष्ट्रातील मातंग व बौद्ध समाज हा या जातीयवादी मंडळीच्या हल्लाचा, अत्याचारा चा शिकार होत आहे हे स्पष्ट
प्रमुख मागण्या
१. वरिल नांदेड जिल्ह्यातील घटनांमध्ये नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक साहेबांनी ह्या घटना गांभीर्याने घेऊन, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जातीय अत्याचारी लोकांचा बंदोबस्त करावा, या दोन्ही गावातील घटनाची चौकशी करणेसाठी स्वतंत्र " SIT " ची स्थापना करावी आणि जलदगतीने तपास पूर्ण करावा, हे दोन्ही खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवुन " अक्षय भालेराव " च्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी वंचित बहुजन आघाडी करित आहे...
२. नांदेड, लातूर सह मुंबई व अन्य ठिकाणी घडलेली प्रकरणे अतिशय संवेदनशील असल्याने ही प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कडक शासन करण्यात यावे.
३. पिडीत कुटुंबांना तात्काळ 50 लाखांची आर्थिक मदत करण्यात यावी. 5. त्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे.
४. जातीय अत्याचाराची प्रकरणे झालेल्या गावात अल्पसंख्य बौध्द व इतर मागासवर्गीय समाजाला दीर्घकाळ पोलीस संरक्षण देण्यात यावे.
५. हदगाव तालुक्यातील वाळकी या गावातील मातंग समाजातील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.
६. रेणापूर तालुक्यातील पिडीत मातंग व्यक्तीची तक्रार नोंदवून न घेण्याऱ्या पोलिसांवर देखील गुन्हे दाखल करावेत. 9. सावित्रीबाई फुले वसतिगृह, चर्चगेट येथे घडलेल्या तरुणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात संशयित आरोपीचे डीएनए आणि फिंगर प्रिंट तपासून घ्यावे. अंधारे आणि कडू या दोन वार्डन ची चौकशी झाली पाहिजे. गेट कीपरची चौकशी करण्यात यावी.
७. मुंबईच्या समाजकल्याण विभाग अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे. त्यांचीही चौकशी करण्यात यावी. 11. मुंबई व महाराष्ट्रातील सर्व वसतिगृहांच्या सुरक्षेचे दरवर्षी ऑडीट करण्यात यावे.
८. नागपूर पोलिसांच्या एस आय टी ने ज्या भागात दंगली होणार आहेत त्या भागांची नावे सरकारला कळविली आहेत. ती ठिकाणे जाहीर करून नागरिकांमध्ये जागरूकता आणावी जेणेकरून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे
जागर जनस्थानसाठी,
सुमित निकम,भुसावळ.
संबंधित बातम्या
