खंडाळा घाटात दरड कोसळल्याने रेल्वेसेवा विस्कळीत

खंडाळा घाटात दरड कोसळल्याने रेल्वेसेवा विस्कळीत

जागर जनस्थान ऑनलाईन

पुणे-मुंबई लोहमार्गावर खंडाळा घाटातील नागनाथ ते पळसदरी दरम्यान पहाटेच्या सुमारास दरड कोसळली आहे. त्यामुळे पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रेल्वे गाड्या खंडाळा, लोणावळा आणि विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. तर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणार्‍या रेल्वे गाड्या कर्जत रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत.

दरड कोसळल्याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. दरड बाजुला काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच रेल्वे वाहतूक सुरळीत होईल असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले.