सेन्सेक्स घसरून 59200 अंकांवर,  निफ्टीचीही घसरण

सेन्सेक्स घसरून 59200 अंकांवर, निफ्टीचीही घसरण

 

जागर जनस्थान ऑनलाईन

आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्सह निफ्टीही घसरला. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 100 अंकांची घसरण झाली. जागतिक बाजारातील मंदीचा परिणाम भारतीय बाजारेपेठेवर होताना दिसत आहे. यामुळेच शेअर बाजारात संथ सुरुवात पाहायला मिळते.

आज शेअर बाजार सुरु होताना सेन्सेक्स 96.60 अंकांनी म्हणजे 0.16 टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्स 59,235.98 अंकांवर होता. सुरुवातीला निफ्टीही साधारण व्यवहार करत होता, मात्र काही वेळाने निफ्टी 22 अंकांनी घसरला.