
Sensex 130 अंकांनी वधारला, निफ्टीमध्ये 39 अंकांची वाढ
जागर जनस्थान ऑनलाईन
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 130 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 39 अंकांची वाढ झाली आहे. सेन्सेक्समध्ये आज 0.22 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,462 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.22 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,698 अंकांवर पोहोचला.
आज शेअर बाजार बंद होताना 1771 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1531 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तसेच 142 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज ONGC, Tata Steel, NTPC, UPL आणि Power Grid Corp या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Divis Lab, Apollo Hospitals, Infosys, Maruti Suzuki आणि Tata Consumer Products या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली.
आज शेअर बाजार बंद होताना ऑईल अॅन्ड गॅसच्या शेअर्समध्ये आज 2.5 टक्क्यांची वाढ झाली तर मेटल आणि उर्जाच्या शेअर्समध्ये 1.5 टक्क्यांची वाढ झाली. तर फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची तर आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये 0.76 टक्क्यांची घट झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही काहीशी वाढ झाली.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आज दोन पैशांनी घसरली असून आज रुपयाची किंमत ही 79.65 इतकी आहे. आज शेअर बाजार सुरु होताना सेन्सेक्स 96.60 अंकांनी म्हणजे 0.16 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 59,235.98 अंकांवर होता. तर बाजार उघडताच सुरुवातीला निफ्टीही साधारण व्यवहार करत होता, मात्र काही वेळानं निफ्टी 22 अंकांनी घसरला.
आज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
• ONGC- 4.82 टक्के
• Tata Steel- 3.25 टक्के
• NTPC- 3.16 टक्के
• UPL- 2.79 टक्के
• Power Grid Corp- 2.33 टक्के
आज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली
• Divis Labs- 5.62 टक्के
• Apollo Hospital- 2.64 टक्के
• Infosys- 1.60 टक्के
• Maruti Suzuki- 1.30 टक्के
• TATA Cons. Prod- 1.29 टक्के
संबंधित बातम्या
