आत्मचिंतन केले असते, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती

आत्मचिंतन केले असते, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती

उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

जागर जनस्थान ऑनलाईन

प्रत्येकालाच सत्ता हवी असते. आत्मचिंतन केले असते, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा टोला उदयनराजे भोसले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला. शिवसेना माझी आहे, असे मी म्हणू का? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. आता जे एकत्र आले आहेत ते कायमस्वरुपी एकत्र राहतील, असे दिसते आहे असेही ते यावेळी म्हणाले. उदयनराजे भोसले यांनी आज कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांची पुण्यात भेट घेतली.

शिवसेना ठाकरेंची की शिंदे गटाची? असा प्रश्न विचारला असता उदयनराजे यांनी संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, शिवसेना माझी आहे असे मी म्हणू का? असे त्यांनी उत्तर दिले. कोणाला मंत्रिपद द्यावे कोणाला नाही ते देणाऱ्यांनी ठरवावे, मी त्या ठरवणाऱ्यांमध्ये नाही, असे त्यांनी मंत्रिपदाच्या प्रश्नावरून उत्तर दिले. मराठा आरक्षणावर नुसतेच पाट्या लावून फिरतात. देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनाच जातीयवादी म्हणतात. मी जातपात बघत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातपात पाहिली नाही, मग मी कसा पाहीन? असेही उदयनराजे म्हणाले.